vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

राज्य प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट दिली.

एनडीएच्या भेटीदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री एनडीएच्या कॅडेट्स बरोबर प्रेरणादायी आणि उद्बोधक संवादात्मक सत्रात सहभागी झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्र उभारणी आणि नैतिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातील लष्करी नेत्यांनी देशसेवेत दृढ रहावे आणि शिस्त आणि धोरणात्मक दूरदृष्टी या कालातीत मूल्यांना मूर्त स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अमित शाह यांची ही भेट प्रबोधिनीसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता, ज्यामुळे कॅडेट्सना उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची, तसेच दूरदृष्टी आणि स्पष्ट उद्दिष्ट ठेवून सेवेतील आव्हाने स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली, आणि उत्तम चारित्र्य, क्षमता आणि धैर्य असलेले अधिकारी तयार करण्याच्या एनडीएच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली.

संबंधित पोस्ट

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

महापालिका क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

राजधानीत मराठी भाषा – संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री उदय सामंत दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

vishwatmaklokswamivarta

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात