vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधान परिषद नामनियुक्त सदस्य आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही – राज्य सरकार.

विधान परिषद नामनियुक्त सदस्य आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही – राज्य सरकार

 

प्रतिनिधी.विधान परिषद नामनियुक्त सदस्य : आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती.

राज्यपालांकडून अद्याप याबाबत काहीही कळवण्यात आलेले नाही, सरकारचं प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणं.

विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती. आठ महिने उलटूनही राज्यपालांनी याबाबत निर्णय घेतला नाही, असे राज्य सरकारनेउच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी १२ जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडे सादर केली, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राज्यपालांनी अद्याप याबाबत निर्णय न घेऊन त्यांच्या घटनात्मक कर्तव्याचा भंग केला आहे, असे नाशिकच्या रतन लूथ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सादर केले.

नामनियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करावी, याबाबत याचिकाकर्त्यांचे काहीही म्हणणे नाही. याचिकाकर्ते केवळ निर्णय घेण्यास सांगत आहेत. राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले तरी त्यांचे ,

राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले तरी त्यांचे निर्णय कायदेशीर कारवाईच्या कक्षेत यायला हवेत, असा युक्तिवाद लुथ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात केला.

संबंधित पोस्ट

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा

भारतासाठी ऐतिहासिक क्षण; चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, ISRO च्या प्रयत्नांना मोठे यश… भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला,चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या 380 विक्रमी फेऱ्या चालवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबईकरांनो सावधान! राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक 27 टक्के सक्रिय रुग्ण मुंबईतच

vishwatmaklokswamivarta