vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

लातूर, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी यांच्या आदेशनुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील गठीत होणाऱ्या लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत लातूर उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सोडत होणार आहे.

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायातींपैकी २३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहणार असून यापैकी ११ पदे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ सरपंच पदे राखीव असतील, यापैकी १ पद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव राहील. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३० पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी १५ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहतील, यापैकी २८ सरपंच पदे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील.

लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित रहावे, असे लातूरचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

****

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत-अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ स्पर्धा

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण 

vishwatmaklokswamivarta