vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी: म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये रहिवाशांना वीज, पाणी, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून इमारतींचा विकास करताना क्लस्टर आधारित विकास व्हावा, असा म्हाडाचा प्रयत्न असून या माध्यमातून रहिवाशांना अधिक सुविधा देता येतील, असे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, म्हाडामार्फत क्लस्टर आधारित विकास करताना काही सदनिका बाजारभावाने विकून निधी उभारला जातो. या माध्यमातून अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. जुन्या रहिवाशांना देखील या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच वाहनतळाची सुविधा दिली जात आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पांमध्ये व्यायामशाळा, बाजारपेठ आदी सुविधाही दिल्या जात आहेत. यामध्ये यापुढे हरित क्षेत्राचा समावेश करण्याबाबत देखील विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इमारतींचा विकास करताना विकासकास रेरा कायदा अनिवार्य असून याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले

00000

 

बी.सी.झंवर/विसंअ

संबंधित पोस्ट

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta

NUJ महाराष्ट्र महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितासाठी तेज संघर्ष करेल – श्री एस कुमार

vishwatmaklokswamivarta

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन