vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  स्वच्छ शहराचा बहुमान वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस विविध संस्थांचेही महत्वपूर्ण योगदान लाभत असते. अशाच प्रकारचा ‘रन फॉर क्लिन नवी मुंबई (चला धावूया स्वच्छ नवी मुंबईसाठी)’ हा एक अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने डॉ. डि वाय पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या वतीने ‘घे भरारी’ शिर्षकांतर्गत राबविण्यात येत आहे.

  8 मार्च 2025 रोजी, सकाळी 6.30 वाजता, सायन पनवेल महामार्गा नजिकच्या सर्व्हीस रोडवर असलेल्या डॉ. डि वाय पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशव्दारापासून या महिला मिनी मॅरेथॉनला प्रारंभ होणार असून 5 कि.मी. अंतराच्या या मिनी मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणारी ही मिनी मॅरेथॉन धावण्याचे महत्व अधोरेखीत करीत आरोग्यपूर्ण जीवनाची गरजही सांगणार आहे.

  या महिला मिनी मॅरेथॉनव्दारे स्त्री सक्षमीकरणाचा गौरव केला जाणार असून त्यासोबतच स्वच्छ व हरित नवी मुंबईला चालना मिळणार आहे. घरापासूनच कचरा वर्गीकरणातून अधिक शाश्वत व सर्व समावेशक भविष्याकडे वाटचाल करताना स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजविणारी ही मॅरेथॉन असणार आहे.

   घे भरारी या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी 8097109241 / 8369275667 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली असतांनाही प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी*धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांना बजावली ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’*

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे · अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती

vishwatmaklokswamivarta

१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका पोहचणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहित्य संमेलनाच्या अटेकेपार डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन