vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनातन संस्थेच्या वतीने दादर, कोपरखैरणे आणि ठाणे यांसह देशभरात ७७ ठिकाणी‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा ! – सनातन संस्थेचे आवाहन

 सनातन संस्थेच्या वतीने दादर, कोपरखैरणे आणि ठाणे यांसह देशभरात ७७ ठिकाणी‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा ! – सनातन संस्थेचे आवाहन

  राज्य प्रतिनिधी-  मुंबई – धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्‍यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे. गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. त्या ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर गुरुवार, १० जुलै २०२५ या दिवशी कोपरखैरणे येथे संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत होत्या. या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या वतीने यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव दादर, कोपरखैरणे, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, पनवेल आणि उरण यांसह देशभरात ७७ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले.

      दादर येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा (सेवानिवृत्त) म्हणाले, ‘सर्व देवतांच्या हातात शस्त्र आहे. आपण धर्मयोद्धा बनले पाहिजे. येणारी पिढी ‘अभिमन्यू’ आहे. अभिमन्यूप्रमाणे धर्मरक्षणासाठी लढणार्‍या हिंदूंच्या भावी पिढीला पालकरूपी पांडवांनी धर्माचे पूर्ण ज्ञान द्यावे. जेणेकरून हिंदूंची भावी पिढी अभिमन्युप्रमाणे धर्मलढ्यामध्ये बळी पडायला नको. आपल्या भावी पिढीला योग्य संदेश द्यायचा आहे. हिंदूंचा बळ, बुद्धी आणि विद्येचा संघटित समूह बनवला पाहिजे, त्याला रणनीती आणि भक्तीची जोड दिली पाहिजे’. यावेळी पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनीही मार्गदर्शन केले.   ठाणे येथील महोत्सवात हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘जगद्गुरू भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आजच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद सद्गुरू डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना गुरुकृपायोग साधनेचा मार्ग दाखवून मानव जन्माचा उद्धार करण्याचा मार्ग दाखवला आहे. सनातन संस्था हे संस्कार घडवणारे संघटन असून अधिकाधिक हिंदूंनी या माध्यमातून साधना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा’: पनवेल येथील महोत्सवात हिंदू जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम संबोधित करताना म्हणाले की, आज संपूर्ण जगावर तिसर्‍या महायुद्धाची टांगती तलवार आहे. देशांतर्गतही पहलगाम प्रमाणेच दंगली, फेक नॅरेटिव्हज्’, लव्ह जिहाद, लँड जिहाद करून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंनी साधना करून आपले आध्यात्मिक बळ वाढवावे आणि अधर्माविरुद्ध कृतीशील व्हावे’.     ठिकठिकाणी झालेल्या महोत्सवांचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. यावेळी स्वरक्षा प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, रणरागिणी, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. दादर येथील महोत्सवात मान्यवर वक्त्यांच्या हस्ते सनातन संस्थाद्वारा प्रकशित ‘भगवान शिव की उपासना का अध्यात्मशास्त्र’ या ई-बुक चे प्रकाशन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन : दादर आणि ठाणे येथील गुरुपौर्णिमा महोत्सवांत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन लावण्यात आले. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रदर्शनाचा मुंबईतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह शेकडो हिंदूंनी याचा लाभ घेतला. ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव: सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. देशविदेशातील हजारो दर्शक आणि हिंदू भाविकांनी याचा लाभ घेतला.श्री. अभय वर्तकप्रवक्ता, सनातन संस्था(संपर्क क्रमांक : 9987922222)

———————————————–

संबंधित पोस्ट

पर्यटकांसाठी पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शनासाठी सहलीचे आयोजन

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ला वेग

शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा आणि समन्वयाने 100%उद्दिष्ट पूर्ती करा– जिल्हाधिकारी किशन जावळेपीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा-

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग    विषयावरील कार्यशाळा संपन्न