vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी  नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी  नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी ॲप वर आधारित राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

     विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सीच्या विविध विषयासंदर्भातील बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.  परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे.

राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल. ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात, शासनाने बनविलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन होणार दक्षता समिती शिक्षण मंडळाचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.