vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान

      सांगलसां प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत दि. 14 ते 18 जुलै 2025 या कालावधीत विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकरिता शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंध व पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगली व मिरज येथील तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयात शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

     प्रथम टप्प्यात सांगली जिल्ह्यातील निवडक 50 महाविद्यालयात दररोज 10 कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 9 समतादूत पूर्ण क्षमतेने या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच, संबंधित सर्व संस्थांचे सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

एनडीआरएफ, एसडीआरएफमार्फत नवी मुंबई महापालिकेत आपत्ती व्यवस्थापनाविषयक प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

आयुष्मान भारत डिजिटल मिशन**रुग्णोपचार करण्याआधी सर्वसामान्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध**‘मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे’ पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उद्घाटन संपन्न*डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचे मोठे पाऊल*

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

सरला बेट विकास आराखडा व देवगाव शनि येथील बंधाऱ्यासमंजूरी देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।