vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, प्रतिनिधी : कांदळवन हे समुद्रापासून संरक्षणासाठी नैसर्गिक संरक्षण भिंत असून कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करणे पर्यावरणाच्या समतोलासाठीही महत्वाचे आहे. यासंदर्भात किनारपट्टी नियमन समिती (सीआरझेड) गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक संबंधित यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आयोजित करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कांदळवनांच्या संरक्षणाबाबत सदस्य शांताराम मोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्या नाना पटोले यांनीही सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, कांदळवनांच्या संरक्षणाची जबाबदारी सामूहिक आहे. कुठेही अवैधरित्या भराव किंवा डेब्रिज टाकून अतिक्रमण करण्यात येत असल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

00000

संबंधित पोस्ट

21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिन योगसाधना हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली…

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची- सांस्कृतिक कार्यमंत्री अड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट*स्थलांतरीत मजूरांच्या पाल्यांच्या संगोपन उपक्रमाची पाहणी,बालकांचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी- आयुष्मान खुराणा…

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta