vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया ५ ते ७ टक्के जास्त दराने झाल्याचे आढळून आल्याने ती संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलयाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, शासनाने महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने या निविदा रद्द केली. या निविदा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेला कोणतेही थेट आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र, निविदा प्रक्रियेदरम्यान झालेला प्रशासकीय खर्च कोणाकडून वसूल करायचा याबाबत महापालिकेला निर्देश दिले जातील. तसेच सदस्यांना विशिष्ट निविदांबाबत काही शंका असल्यास किंवा कुठल्या निविदांची सखोल चौकशी आवश्यक आहे असे वाटत असल्यास त्यांनी संबंधित माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000p

संबंधित पोस्ट

बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत बैठक…

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

vishwatmaklokswamivarta

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे

मी प्रथम देशाचा हे कायम लक्षात ठेवून देशसेवा करा –डॉ. जयपाल पाटील उंबरखिंड,