vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय विश्रामगृहामध्ये या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय विद्यार्थी तसेच इयत्ता 11 व 12 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. यासाठी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. विभागीय शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश वेळापत्रकानुसार काही प्रमाणात बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वसतिगृह प्रवेशाकरीता अर्जाची अंतिम तारीख, प्रवेश यादी जाहीर होण्याची तारीख शालेय विद्यार्थी १७ जुलै २०२५, २१ जुलै २०२५ रोजी व इयत्ता ११ वी व १२ वी २३ जुले २०२५ रोजी. २५ जुलै २०२५ रोजी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच, वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी गुणवत्ता व आरक्षणाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणामुळे फॉर्म भरू शकला नसेल, तर आठवड्याच्या आत फॉर्म भरून घ्यावा. वसतिगृहांमध्ये शिल्लक जागा राहिल्यास, मुदत संपल्यानंतरही अर्ज स्वीकारून प्रत्येक आठवड्यात नवीन यादी जाहीर केली जाईल. प्रवेश प्रक्रियेची पारदर्शकता राखण्याचे व ती योग्य प्रकारे पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे श्री सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांनी कळविले आहे.

000

संबंधित पोस्ट

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शेती, संस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

सण-उत्सव एकोप्याने साजरे करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

अमृत आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta