vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

            मुंबई, प्रतिनिधी: मालेगाव सह राज्यातील सर्वच अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.मालेगाव येथील अनधिकृत कत्तलखान्यांच्या संदर्भात विधानपरिषदेत सदस्य विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मालेगावमधील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागात कत्तलखान्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनधिकृतपणे चालणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई करणे अपेक्षित असून, काही ठिकाणी कारवाई झाली आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाला आणखी कडक सूचना दिल्या जातील आणि जेथे अवैध कत्तलखाने सुरू आहेत, तिथे तातडीने कारवाई करण्यात येईल.

सणांच्या दिवशी महानगरपालिका व नगरपालिकांच्या माध्यमातून काही ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारले जातात. अशा ठिकाणी वाळू-मातीचा वापर करून रक्तवाहन थांबवण्याची काळजी घेतली जाते, असेही मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

 मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी सोडल्याचा पुरावा सदर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याबद्दल चौकशी करून कारवाई केली जाईल. मोसम नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने 10 कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातील 5 कोटी 26 लाख रुपये मालेगाव महानगरपालिकेला देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई,पाण्याचे नमुने सातत्याने तपासावेत नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळाव लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

खते कुठे उपलब्ध?”आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहितीजिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन..

जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावीकामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी पाऊल

vishwatmaklokswamivarta