vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना २०२५-२६ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकमार्फत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

पात्रता निकष:• अर्जदाराचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे• दिव्यांग व्यक्तींसाठी वयोमर्यादा ४० वर्षे• कला/साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षे सातत्यपूर्ण व दर्जेदार योगदान असणे आवश्यक• अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- रुपयांपेक्षा कमी असावे• फक्त कलेवर अवलंबून असणारे किंवा सध्या उत्पन्नाचा अन्य स्रोत नसलेले कलाकार• केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले• अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक• विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, वयाने ज्येष्ठ कलाकारांना प्राधान्

आवश्यक कागदपत्रे:• वयाचा दाखला• आधार कार्ड• रहिवासी दाखला• उत्पन्नाचा दाखला• प्रतिज्ञापत्र• पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)• बँक पासबुक झेरॉक्स• अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास)• पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)• शिफारसपत्र (नामवंत संस्था/व्यक्तीचे – लागू असल्यास)• कलात्मक कार्याची विविध साक्षी/पुरावे

 ठाणे जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात  संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

vishwatmaklokswamivarta

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta