vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यइतर

दृष्टी आपल्या हक्काची, काळजी आपल्या आरोग्याची”“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियानाअंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेस ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

“दृष्टी आपल्या हक्काची, काळजी आपल्या आरोग्याची”“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियानाअंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेस ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभर “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” हे विशेष अभियान २२ जुलै, २०२५ ते २२ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे मोतीबिंदूसारख्या आजारामुळे होणाऱ्या अंधत्वाचे उच्चाटन करणे आणि नेत्रविकाराच्या लवकर निदानासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

    या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील ७ हजार १८२ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, ही मोहीम जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबवली जात आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात व्यापक पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

* अभियानाची वैशिष्ट्ये:*• मोतीबिंदू रुग्णांची मोफत नेत्रतपासणी• आवश्यक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया• तपासणीपूर्वी आणि नंतरची औषधे पूर्णतः मोफत• निवडक रुग्णालयांमध्ये ने-आण सुविधा• शालेय विद्यार्थी, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थांचा जनजागृतीमध्ये सहभाग

पात्र लाभार्थी:• ४० वर्षांवरील सर्व नागरिक• नेत्रविकारांनी ग्रस्त कोणत्याही वयोगटातील व्यक्ती (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)• मोतीबिंदूचे पूर्व निदान झालेले रुग्ण

लक्षणे ओळखा:• अस्पष्ट किंवा धुरकट दृष्टी• रात्री पाहण्यास अडचण• डोळ्यात दुहेरी प्रतिमा दिसणे• वाचन किंवा टीव्ही पाहताना त्रास• वारंवार चष्मा बदलण्याची गरज• रंग फिकट दिसण

शिबिरांचे आयोजन:जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अधिसूचित खासगी रुग्णालयांमध्ये ही तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. आरोग्य सेवक, सेविका, आशा व समुदाय आरोग्य अधिकारी हे घरोघरी भेटी देऊन संशयित रुग्णांची यादी तयार करत आहेत.

जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभाग सर्व नागरिकांना आवाहन करतो की, नेत्रविकारांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत तपासणी करा आणि आशा कार्यकर्ती / ANM / आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृ

मुंबईचे तापमान ३६.३ अंश

मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग घेण्याकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन*

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

vishwatmaklokswamivarta

आदिवासी भागात आरोग्य विषयक जनजागृती करावी- मंत्री डॉ. अशोक वुईके