vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ऑडीची एसयुव्ही-एसयुव्हीची पुढील आवृत्ती भारतीय बाजारात सादर

एसयुव्हीची पुढील आवृत्ती भारतीय बाजारात सादर ऑडीची एसयुव्ही…

व्यावसायिक प्रतिनिधी-जर्मन लक्झरी वाहन उत्पादक ऑडीने क्‌यू 7 एसयुव्हीची पुढील आवृत्ती भारतीय बाजारात सादर केली आहे. ही गाडी कंपनीने अनेक वैशिष्ट्यांसह आणली आहे. यात ब्लॅक कलर स्टाइल उपलब्ध आहे. ग्लॉसी ब्लॅक ग्रिल आणि ब्लॅक आउट लोगो देखील आहे. एसयुव्हीच्या खिडक्या, ओआरव्हीएम आणि रूफ रेल्सच्या आसपास काळ्या रंगाचा वापर केला गेला आहे, क्यू-7 च्या या नव्या आवृत्तीमध्ये कंपनीने तीन-लीटर व्ही 6 इंजिन दिले आहे. ज्यामध्ये 48व्ही सौम्य हायब्रीड तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. या इंजिनमधून एसयूव्हीला ३३५ बीएचपी आणि ५०० न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. एसयूव्हीमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे.

एसयुव्ही फक्त 5.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. त्याचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीने 19 इंच अलॉय व्हील, मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, सिग्नेचर डीआरएल, एलईडी टेल लॅम्प, डायनॅमिक टर्न इंडिकेटर, ड्रायव्हिंगसाठी सात मोड, पॅनोरमिक सनरूफ, ॲम्बियंट लाइट्स, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस, एमएमआय टच रिस्पॉन्ससह एमएमआय नॅव्हिगेशन प्लस, 19 स्पीकरसह प्रीमियम 3 डी साउंड सिस्टीम, क्रिकेट लेदर अपहोल्स्ट्री, फोर झोन एसी, कम्फर्ट की आणि की-लेस कंट्रोल सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…