vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीतिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीतिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

मुंबई, प्रतिनिधी :- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या चार लेन असलेला हा रस्ता सहा लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान चार लेन रस्त्याचे सहा लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या दोन लेन असलेला मार्ग सहा लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तत्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे, बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे, जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.

***

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी‘महाकुंभा’ची निर्मिती करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..