vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील १०६ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२२ व २०२३ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२३ व २०२४ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

सोहळ्यामध्ये ६४ पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर चार पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. तसेच ३८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

सोहळ्यात प्रधान सचिव (विशेष) अनुप कुमार सिंह, राज्य गुप्तवार्ता विभागातून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी देशमुख, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सेवा दिलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले 000

संबंधित पोस्ट

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी करणार..

९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण०३ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह ०६ सदस्यांचा समावेश*एके-४७ व कार्बाईनसह आत्मसमर्पण; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त*