vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

सातारा द प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अंगणवाडीच्या बालकांच्या सकस व पोष्टिक आहार देण्यासाठी ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांच्या दायित्वातून बालकांना सकस व पौष्टीक आहार मिळत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ फलटणच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलबाबा नगर व धुळदेव येथे करण्यात आला.

शुभारंभ प्रसंगी धुळदेव देवस्थान ट्रस्ट चेअरमन दत्तात्रय भिवरकर, बापूराव भिवारकर, महादेव चोरमले, संदीप सरक, सरपंच मनीषा पवार, व्यंकटराव दडस आदी उपस्थित होते.

 या उपक्रमांतर्गत शेंगदाणा, गुळ लाडू, खजूर, केळी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की काही ठिकाणी तर अगदी काजू , बदामही नागरिकांनी अंगणवाडतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी दिले.

 आमची मुलं घरी असे पौष्टिक पदार्थ खात नाहीत, मात्र अंगणवाडीमध्ये एकमेकांच्या संगतीने अगदी आनंदात पौष्टिक आहार फस्त करतात अशा भावनाही पालकांनी व्यक्त केल्या.

फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार दिला जातो. नागरिकांनी आपले सामाजिक दायित्व समजून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार द्यावे, असे आवाहनही बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी केले आहे.  प्रकाश मोरे, सचिन नाळे , अक्षय सोनवणे, सतीश ठोंबरे, हरी पवार व दत्तू खरात यांनी अंगणवाडीसाठी पौष्टिक आहार उपलब्ध करुन दिला.

00000

संबंधित पोस्ट

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*— खा.श्रीरंग बारणे*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*

नवी मुंबई महानगरपालिका लोककल्याण मेळावा अंतर्गत फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न..

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवा – रोहयो मंत्री भरत गोगावले

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल