vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पोहोचवण्याचे व पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्ती ही अनपेक्षित असली, तरी नागरिकांवर त्याचे परिणाम गंभीर असतात. अशावेळी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने प्रतिसाद द्यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कुठलाही अडथळा न होता शासकीय मदत तातडीने पोहोचली पाहिजे. नुकसानीचे वर्गीकरण करुन पंचनाम्याचे काम झपाट्याने पूर्ण करा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रातील नुकसानीचे मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावावी. तसेच शासन स्तरावरील प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून अनुदान व भरपाई तत्काळ मंजूर होऊ शकेल.

बैठकीत पूरस्थितीग्रस्त, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली शेती, घरांचे नुकसान, रस्ते वाहतूक तसेच वीज आणि पाणीपुरवठा या बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच एप्रिल ते जून 2025 या कालावधीत अवेळी पाऊस, गारपीठ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे मदत येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री ना.पाटील यांनी यावेळी दिले.

000000

संबंधित पोस्ट

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणारतुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन 

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर,दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी