vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा मायावती यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा मायावती यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

आगरा द प्रतिनिधी ~ देशभरातील सर्व दलितांनी एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा.विविध दलितांच्या ऐक्यातून मजबूत होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद बहन मायावती यांनी स्वीकारावे असे राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिकन ऐक्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज आगरा येथे केले.

आगरा येथील सुरसदन सभागृहात उत्तर प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्या आला होता.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.मायावती यांनी उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविले आहे.त्या आज देशात सर्वात वरिष्ठ दलित नेत्या आहेत.त्यांना मुख्यमंत्री करण्यात मान्यवर कांशीराम यांचे मोठे योगदान आहे.उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी सामाजिक क्रांतीसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण असून त्यांचा आम्ही आदर करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी देशभरातील दलितांनी एकजूट उभारणे गरजेचे असून देशभरातील रिपब्लिकन ऐक्याचे राष्ट्रीय नेतृत्व मायावती यांनी करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी आज केले.आगरा हा आंबेडकरवाद्यांचा बालेकिल्ला आहे.आगरा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य प्रमाणात साजरी केली जाते. आगरा येथेच देशात जयभीम चा नारा पहिल्यांदा बुलंद करण्यात आला होता.दलितांनी सामाजिक एकजुटी सोबत राजकीय एकजूट उभारली पाहिजे असे मत न.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.उत्तर प्रदेशात आता बसपा चा केवळ एक आमदार आणि एक खासदार आहे.बसपा चा राजकीय करिष्मा लोपला आहे.त्यामुळे उत्तर प्रदेशातील बसपा कार्यकर्त्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हाती घ्यावा.उत्तर प्रदेशात जेव्हा चौधरी चरण सिंह यांचे सरकार होते तेव्हा उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे 4 आमदार निवडून आले होते.आता आगामी काळात उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे किमान 5 आमदार निवडून आणू असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

0000

0

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार…

मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या-आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम 23 एप्रिलला

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीतिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

राज्यातील नाशिक रेड अलर्ट-आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

vishwatmaklokswamivarta

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…