vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा…

राज्य प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवा येत्या 23 ऑगस्ट 2025 पासून 10 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असणार आहेत..

या कालावधीत दररोज धावणारी एक गाडी दिवा स्थानक ते चिपळूण दरम्यान असून, ती सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल व चिपळूण येथे दुपारी दोन वाजता पोहोचेल. परतीची गाडी चिपळूणहून संध्याकाळी साडेतीन वाजता सुटेल आणि रात्री साडेदहा वाजता दिवा स्थानकात पोहोचेल.लोकमान्य टिळक टर्मिनसहून मडगाव, सावंतवाडी रोड आणि पुणे ते रत्नागिरी या मार्गांवर देखील साप्ताहिक विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या मुख्यतः सहा, नऊ आणि बाराशे वाजेच्या दरम्यान सुटतील व पुढील दिवशी गंतव्य स्थानकावर पोहोचतील. काही गाड्यांमध्ये थिवी व करमळी यांसारख्या स्थानकांवरही थांबा असेल.पुणे ते रत्नागिरी या मार्गावर देखील दोन साप्ताहिक गाड्या धावतील. त्या रात्री सव्वाबाराच्या सुमारास पुणे स्थानकातून सुटतील आणि सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचतील. परतीची गाडी रत्नागिरीहून संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता पुण्यात पोहोचेल.

या विशेष गाड्यांमुळे मुंबई, पुणे, ठाणे व अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून प्रवास नियोजन करावे, गर्दी टाळावी आणि गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

संबंधित पोस्ट

पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे वेगात पूर्ण होण्यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार – मंत्री गुलाबराव पाटील

सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे सुरेखा शिंदे पुन्हा स्वत:च्या पायावर उभ्या झाल्याआ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील कृतीने मुलीच्या डोळ्यात आले पाणीआई पुन्हा चालू लागली… हे केवळ वैद्यकीय यश नाही, तर सुधीरभाऊंसारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, सन 2026-27 साठी एकूण 751 कोटी 8 लाखांचा प्रारूप आराखडा मान्य- उद्या राज्यस्तरीय बैठकीत आराखडा सादर होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!