vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

श्रावणी सोमवार निमित्त नवी मुंबईतील शिव मंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यूबाबत जनजागृती

श्रावणी सोमवार निमित्त नवी मुंबईतील शिव मंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यूबाबत जनजागृती

 

     आरोग्य प्रतिनिधी     श्रावण महिना हा सण – उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात मोठया प्रमाणावर व्रतवैकल्ये केली जातात. विशेषत्वाने श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये नागरिकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये आरोग्यविषयक शिबीरे आयोजित केल्यास नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर जनजागृती होईल हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील 17 शिवमंदिरांमध्ये हिवताप, डेंग्यू व साथीच्या आजारांबाबत माहिती व उपाययोजना देणारी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली होती

  या 17 ठिकाणी 8419 नागरिकांनी भेट देऊन प्रात्यक्षिकांसह माहिती जाणून घेतली. तसेच 185 नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

 नवी मुंबईकर नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणा-या डास प्रतिबंधात्मक व जनजागृती कार्यवाहीसोबतच आपल्या घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणेबाबत जागरुकता दाखवली तर नवी मुंबई शहरात हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल. तरी त्यादृष्टीने नागरिकांनी याविषयी जागरुक राहून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे NQAS राज्यस्तरीय मूल्यांकन संपन्न; आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर ‘NQAS’ टीमकडून समाधान

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्याचा मोठा पुढाकार