vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या न्यायालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन

उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या न्यायालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन

रायगड प्रतिनिधी:- उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या अलिबाग येथील न्यायालयात दि.11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट व 25 ऑगस्ट 2025 या दिवशी सकाळी 12.00 ते दुपारी 02.00 व दुपारी 03.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून उपविभागातील अलिबाग व मुरुड तालुक्यातील व या न्यायालयातील संबंधित सर्व मान्यवर विधिज्ञ, संबंधित पक्षकारांनी अपिलांचा जलद गतीने निपटारा करण्याचे असल्याने सदर दाखल असलेल्या अपिल प्रकरणांमध्ये या न्यायालयात “महसूल लोक अदालती मध्ये त्या दिवशी आयोजित होणाऱ्या सुनावणीचे दिवशी संबंधित विधिज्ञ व त्यांचे पक्षकार यांनी समेटाने मिटणाऱ्या प्रकरणांमध्ये लेखी म्हणणे न चुकता सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केले आहे.महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामाकाजामध्ये अनेक वेळा महसुली दावे दाखल झाल्यानंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. याकरिता महसूल मंत्री, महोदयांनी दि.23 जुलै 2025 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महसुल अधिकारी यांच्या घेतलेल्या आढावा सभेमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार या न्यायालयाकडील प्रलंबित असलेल्या सर्व अपिले/दाव्यांचे अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांनी त्यांच्याकडील क्रमांक अजिरा/महसुल लोक अदालत/2025, दि.29 जुलै 2025 रोजीच्या आदेशाने या न्यायालयात “महसूल लोक अदालत” चे आयोजन करुन सदरची अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने निर्णयांकित करणेकामी सूचना दिलेल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 13 दिवसावर येऊन ठेपले असून मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे व सेल्फी काढणारा गणपती मोटार मध्ये बसलेला गणपती अशा विविध प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची पुर्नगठीत करण्यासाठीइच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नतीअभियान व RSETI यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा स्तरीय कौशल्य मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

एफएसएसएआयने राज्यांना फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे केले आवाहन.एफएसएसएआयने फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आणली बंदी..

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभशेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ