vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

    अमरावती, प्रतिनिधी : खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त बसस्थानकासमोरील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ६ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होईल.

   या महोत्सवाचे उद्घाटन ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित राहतील.

   या महोत्सवात, विकेंद्रित सोलर चरखा समूहाच्या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी महिलांनी तयार केलेली दर्जेदार खादी आणि सौर खादी उत्पादने उपलब्ध असतील. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी तयार केलेली विविध उत्पादने सवलतीच्या दरात नागरिकांना मिळणार आहेत. खादी महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहान**रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा* 

सिर्फ दिल, बिना बिल-डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा नवी मुंबईतील रुग्णालयांची केली पाहणी,मोफत आरोग्यसेवेचं केले प्रत्यक्ष निरीक्षण..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती,राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना..

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

नागरिकांनी “एक गाव एक गणपती”संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण  वातावरणात उत्सव साजरा करावा” _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड