vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खामगावं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची विविध पदावर निवड..

खामगावं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची विविध पदावर निवड..

बुलढाणा, प्रतिनिधी : सतगुरू श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथील शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गत सन २०१७ ते २०२२ या कालावधीत विविध व्यवसायात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी आपली यशस्वी वाटचाल करत शासकीय व खाजगी क्षेत्रात विविध पदांवर निवड मिळवली आहे.

विशेषतः विजतंत्री व तारतंत्री व्यवसायातील २०२०, २०२१ व २०२२ साली प्रवेशित प्रशिक्षणार्थी महावितरणमध्ये विद्युत सहायक या महत्त्वाच्या पदावर कार्यरत झाले आहेत. या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये पवन जामोदे, गौरव चव्हाण, शिवराज हागे, विकास ठाकरे, मयुर गव्हाळे, संदेश गोळे, शितल पारसकर, संजना वानखेडे, ज्योत्सना भोजने, गजानन वाघमारे, आशिश तेलगोटे, आकाश पातोंड, कु. शितल राठोड, पंकज वाकोडे, कु. चंचल तायडे, कु. साक्षी सुरवाडे, कु. स्नेहा तेलगोटे, कु. वैशाली आखरे व कु. रोशनी खरले यांचा समावेश आहे. तसेच, फाउंड्रिमॅन व्यवसायात २०१८ व २०१९ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी अभय शिवदास राउत, शुभम एकनाथ बोरडे व सुमेध सुरेश बोदडे यांची रेल्वे टेक्निशियन आणि ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये टेक्निशियन पदांवर नियुक्ती झाली आहे, ही बाब संस्थेसाठी अत्यंत गौरवास्पद आहे.

या सर्व यशामध्ये संस्थेचे प्राचार्य श्री. एस. डी. गंगावणे, उपप्राचार्य श्री. व्हि. व्हि. काळे, गटनिदेशक श्री. जे. व्हि. काळे, श्री. व्हि. के. सुपे, श्री. एन. एस. गावडे, श्री. व्हि. एस. भोजने, श्री. डि. जे. वानखडे, शिल्पनिदेशक श्री. ए. बि. माडीवाले, श्री. एस. जि. तायडे, श्री. एस. ए. खापर्डे व इतर सर्व शिल्पनिदेशक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेतील सर्व कर्मचारीवृंदांनी या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या व मार्गदर्शक निदेशकांचे मनःपूर्वक आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

झटपट नोकरीची हमी, लघुउद्योग करावयाचा आहे का..! कुशल कारागीर व्हायचं आहे..!तर मग आयटीआय ला प्रवेश घ्या…औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश सत्र -2025 साठी ऑनलाईन फॉर्म सुरु…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ६० जप्त वाहनांचा २७ मे रोजी ई-लिलाव* *इच्छुकांनी २१ मे पूर्वी नोंदणी करावी

जी.डी.सी. अण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षेचा अर्ज भरण्यास 17 मार्चपर्यंत मुदतवाढ..

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड काम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta