vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

सातारा, प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारीका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी परवानगी मिळाली आहे. या महाविद्यालयात २ वर्षाचा एएनएम व ३ वर्षाचा जीएनएम हे पदविका अभ्यासक्रम सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम ४ वर्षाचा असणारआहे. सार्वजानिक आरोग्य विभागांतर्गत बी.एस.सी. नर्सिंग सुरु करण्याची मान्यता मिळवणारा सातारा हा महाराष्ट्रातील तिसरा जिल्हा झाला आहे.

जिल्ह्यातील होतकरु विद्याार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण स्थानिक पातळीवर घेता येईल . या शिक्षणाने विद्यार्थ्यांन परदेशात जावून आरोग्य सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नर्सिग क्षेत्रात पदवी शिक्षण सुरु करणारे शासकीय परिचारीका महाविद्यालयास जिल्हास्तरीय पहिली शासकीय संस्था होण्याचा मान मिळाला आहे. या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तसेच भविष्यात विविध पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे सांगितले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मोर्शीत एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;सर्व शासकीय कार्यालये आता एकाच छताखाली येणार

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

आज तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया सख्येंन सहभागी व्हावे. -जिल्हाधिकारी सतोंष पाटील 

रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस· आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य सेवांचे निकष सुधारणार

vishwatmaklokswamivarta

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण