vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज च्या 42 व्या वार्षिक समारंभात शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा

मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज च्या 42 व्या वार्षिक समारंभात शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज [AYJNISHD(D)]या संस्थेने 8 ऑगस्ट 2025 रोजी आपला 42 वा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण आणि समावेशक वातावरणात साजरा केला. सहभागी आणि उपस्थितांमध्ये अधिकारी, पाहुणे, विद्यार्थी, वाचा, भाषा आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता

मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे रजिस्ट्रार, ऑफिसर नरेंद्र मिश्रा यांच्या ‘प्रशासकीय व्यवहारात प्रभावी नेतृत्व’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानाने, 8 ऑगस्ट 2025 रोजी महोत्सवाची सुरुवात झाली. आपल्या व्याख्यानात मिश्रा यांनी सार्वजनिक संस्थांमधील उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि सुशासन यावर भाष्य केले. एकंदर सत्राने उपस्थितांना नेतृत्व आणि प्रशासकीय उत्कृष्टता, याबद्दल मोलाचा दृष्टीकोन प्रदान केला.

आज दुपारी चार वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. प्रमुख पाहुणे, मंत्री आशिष शेलार आणि सन्माननीय अतिथी, कोटक सिक्युरिटीज लिमिटेड, मुंबईचे कायदेविषयक प्रमुख शरद जोशी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. एवायजेएनआयएसडी (डी) चे संचालक डॉ. सुमन कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी प्रमुख पाहुणे, मान्यवर पाहुणे व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला. विविध विषयांमधील शैक्षणिक आणि वैयक्तिक कामगिरीसाठी तसेच उत्तम यश संपादन करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सन्मान पदके देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.विविध क्षेत्रांमध्ये, तसेच शैक्षणिक आणि वैयक्तिक कामगिरीसाठी दिव्यांग विद्यार्थी आणि मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

आशिष शेलार यांनी आपल्या बीजभाषणात वाचा आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एवायजेएनआयएसडी सारख्या संस्था बजावत असलेली भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.

आपला पाठींबा दर्शवत त्यांनी सांगितले की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सामाजिक आधारस्तंभ दिव्यांग व्यक्तींच्या पाठीशी राहिले, तर जीवनाच्या विविध टप्प्यांवर त्यांचे सक्षमीकरण आणि समावेश सुलभ होईल. आशिष शेलार यांनी ‘विकसित भारत’, या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची जोपासना करण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.उद्घाटनानंतर झालेला सांस्कृतिक कार्यक्रम हा दिव्यांग मुलांच्या असाधारण प्रतिभेचा अविष्कार होता. कॉक्लियर इम्प्लांट असलेल्या मुलांसह इतर सहभागींनी सादर केलेले नृत्य, नाटक आणि गायनाने त्यांच्यातील प्रतिभेची अनुभूती मिळाली, आणि उपस्थित मंत्रमुग्ध झाले. एवायजेएनआयएसडी (डी) च्या 42 व्या वार्षिक समारंभाने केवळ गेल्या वर्षातील संस्थेच्या कामगिरीवर प्रकाश टाकला नाही, तर देशभरातील वाचा आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींना सक्षम बनवण्याप्रति संस्थेच्या अढळ समर्पणालाही बळकटी दिली.

 

***

संबंधित पोस्ट

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता-महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान,केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये 2.20 लाख दंडात्मक वसूली व 128 किलो प्लास्टिक जप्त