vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशराजकारण

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..

मुंबई, प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर, मुफ्त बिजली योजनेतंर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी ‘मॉडेल शासकीय सोलर जिल्हा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिली.

 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्पाची अमंलबजावणी होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या जिल्ह्यात जलद गतीने शासकीय इमारतींचे सौरीकरण करण्यात येईल, त्या जिल्ह्यास ‘मॉडेल शासकीय सोलार जिल्हा’ म्हणून घोषित केले जाईल. यासाठी स्पर्धा घेतली जाणार असून यात सहभाग घेण्यासाठी विहित नमुन्यातील पत्र संबंधित जिल्हाधिकारी व महाव्यवस्थापक (महाऊर्जा) यांना प्रमाणित करून पाठवावे लागणार आहे.

महाऊर्जामार्फत पत्रांची छाननी केल्यानंतर ज्या जिल्ह्यात सर्वाधिक सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होतील, अशा जिल्ह्यांना मॉडेल शासकीय जिल्हा म्हणून जाहीर करण्यात येईल.

  दि. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येईल. प्रथम विजेत्यास पाच लाख रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक ३ लाख तर तृतीय पारितोषिकासाठी १ लाख रुपये दिले जाणार आहेत. नागरी सेवा दिनी ( २१ एप्रिल २०२६) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना- पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

जिजामाता महाविद्यालयात ड्रोन प्रात्यक्षिक-जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांचा संयुक्त उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta