vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..

  छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

किरकोळ विक्री दरापेक्षा जादा दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली असून साडेआठ लाख रुपये दंड आकारला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात आली आहे.

   यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जून २०२५ मध्ये मद्याची दरवाढ करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील काही अनुज्ञप्तीधारकांनी कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (MRP) जास्त दराने मद्याची विक्री केल्याची तक्रार राज्य उप्तादन शुल्क विभागास प्राप्त झाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात सर्वंकष विशेष मोहीम राबवली. या मोहिमे दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७देशी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वाम यांनी अशा मद्य विक्रेत्यांवर साडेआठ लाख रुपयांचा दंड आकारला. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध परवाना निलंबन आणि कायमस्वरूपी रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण०३ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह ०६ सदस्यांचा समावेश*एके-४७ व कार्बाईनसह आत्मसमर्पण; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त*

मेहकर येथील एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

vishwatmaklokswamivarta

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन