vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी अटक

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी अटक

मुंबई, प्रतिनिधी :- राज्य वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) 5 कोटी 64 लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणी एका व्यापारी फर्म मालकास अटक केली आहे.या फर्मने प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांची देवाण-घेवाण न करता ITC चा दावा केल्याचे उघड झाले.

   फर्मने 16 एप्रिल 2025 रोजी जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केली असून, तपासादरम्यान 15 कोटी 22 लाख रुपये कोटींचे बनावट टॅक्स क्रेडिट अस्तित्वात नसलेल्या संस्थांमार्फत मिळवले गेले. प्रत्यक्षात कोणतेही वस्तू वा सेवा प्राप्त न होता 42 लाख रुपयांची इनपुट टॅक्स क्रेडिट अतिरिक्त जीएसटी विवरणात दाखवले गेले. मेसर्स साळवे ट्रेडर्सशी संबंधित नसलेल्या, मुंबईत नोंदणीकृत 27 वेगवेगळ्या कंपन्यांशी जोडलेले कोरे स्वाक्षरी केलेले फॉर्म, कोरी चेकबुक व खरेदी-विक्री बीजके जप्त करण्यात आले

      ही फर्म बनावट दाव्यांद्वारे करचोरी सुलभ करण्यासाठी बनावट बीजक जारी करणाऱ्या व प्रसारित करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अटक केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई यांनी अंकुश साळवे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत कारवाईत बनावट बीजक व खोट्या उलाढालीविरुद्ध राज्य जीएसटी विभागाच्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली. ही कारवाई सहायक राज्यकर आयुक्त सुजीत कक्कड यांच्या नेतृत्वाखाली, संतोष खेडकर, संतोष लोंढे, दीप्ती पिलारे तसेच राज्यकर निरीक्षक व कर सहाय्यकांच्या पथकाने राज्यकर उपआयुक्त यास्मीन अजीम मोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.

     राज्य वस्तू व सेवा कर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अकराव्या प्रकरणात अटक करण्यात आली असून करचोरी, बनावट इनवॉईस, खोट्या उलाढाली व बेकायदेशीर ITC विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. करचोरी विरुद्ध विभागाने मोहीम राबवत आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची कारवाई

मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ मध्ये जप्त केलेली ६८,३८,६३५ रुपयांची मालमत्ता मालकांना परत करण्यात आली.

रायगड (उरण) – अडीच लाखांचं हेरॉईन जप्त; ३ आरोपी अटक

हरवलेल्या व्यक्तीचा शोध किशोर बेपत्ता : जयेश चौरसिया ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता.

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर धडक कारवाई1 कोटी 22 लाख 76 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त..