vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

 

जालना, द प्रतिनिधी’

ऑगस्ट (प्रतिनिधी) – जालना शहरातील मस्तगड येथील युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये पियुष मुंगसे, यश मस्के, हरिओम डोळझाके, साई कासार, मंथन यादव, कुशल श्रीगादी, राहुल कुमावत, नैतिक आंबिलवादे, शुभम रहाड, आज्ञान भगत, तनिष्क मस्के, आशिष हेलगट, वंश गाजरे, अमेय जोशी, ईश्वर तिडके, कृष्णा कुलथे, वैष्णव तायडे, वैभव कोल्हे आदी नवयुवकांचा समावेश आहे.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी सर्व युवकांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी सांगितले की “भाजप परिवारात दाखल झालेल्या या नव्या ऊर्जेमुळे पक्ष आणखी सक्षम व सबळ होईल. युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका महत्वाची असून भाजपच्या विचारधारेतून समाजहित साध्य करण्याची संधी नव्या पिढीला मिळणार आहे.” या प्रवेश सोहळ्याला तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. शिवाजी दादा शेजुळ, तसेच भाजपा महानगर व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोवर्धन कोल्हेस्वीय सहायक

संबंधित पोस्ट

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या एअरसाइड कामकाजाची सुरुवात पहिल्या व्यावसायिक विमानाचे आगमन,पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देऊन सन्मानित

vishwatmaklokswamivarta

एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा;आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्हयात सप्तश्रृंगी गडावरुन वाहन कोसळून झालेल्या अपघातात, ६ भाविकांचा मृत्यू —राज्य सरकारकडून भाविकांच्या वारसांना, ५ लाख रुपयांची मदत जाहीर….

vishwatmaklokswamivarta