vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

जालना, प्रतिनिधी : जालना येथील युवा उद्योजकांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोठे पाऊल उचलले आहे. नवी मुंबई येथे उच्च क्षमतेचे, हरित प्रमाणित आणि ऊर्जा कार्यक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते.या कराराअंतर्गत, कंपनीद्वारे परकीय थेट गुंतवणुकीसह एकूण ₹१२,५६४ कोटींची गुंतवणूक होणार असून, सुमारे ११०० पेक्षा अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळून डेटा सेंटर क्षेत्रात जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा राहणार आहे.जालना येथील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. सतीश काश्मिरीलाल अग्रवाल व त्यांचे सुपुत्र श्री. आदित्य अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम आहे.या ऐतिहासिक करारानिमित्ताने जालना महानगर भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते चित्रकूट निवासस्थानी अग्रवाल परिवाराचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक जी मुळे, उद्योगपती अर्जुन जी गेही, भाजप जालना महानगर जिल्हा सरचिटणीस सुनीलजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीचे भाडेमीटर ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलिब्रेशन करून घेण्याचे आवाहन-विहित मुदतीनंतर दररोज ५० रुपये, कमाल ५ हजार रुपये विभागीय दंडात्मक शुल्क; अलिबाग व पेण तालुक्यातील वाहनधारकांसाठीही लागू

vishwatmaklokswamivarta

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

बुलढाण्यातील खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी;४२ आधुनिक कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण; निवास व भोजनाचीही मोफत सुविधा

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -आमदार बाबुसिंगजी महाराज

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर