vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

परळ  येथील एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय , गणपती विसर्जन होताच बंद होणार

परळ  येथील एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय , गणपती विसर्जन होताच बंद होणार

मुंबई प्रतिनिधी-

: प्रभादेवीमधील बहुचर्चित एल्फिस्टन पूल मिळाला  ब्रिटिशकालीन पूल 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. वाहतूक विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. म्हणजेच गणेशोत्वसानंतर पूलाचं पाडकाम सुरु होणार आहे. स्थानिक आणि दुकानदारांच्या विरोधामुळे वारंवार ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या पुलासोबत परिसरातील काही इमारतीही पाडल्या जात आहेत. या इमारतीमधील रहिवाशांनी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याची आणि त्यानंतर पाडकाम कऱण्याची मागणी केली होती. त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानंतर 10 सप्टेंबरपासून एल्फिन्स्टन पूल बंद केला जाणार आहे. हा पूल पाडून तिथे डबलडेकर पूल उभा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर तीन दिवसांनी पूल बंद केला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पूल लवकरात लवकर पाडण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवात पूल पाडला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने 10 सप्टेंबर तारीख निवडल्याचं वाहतूक विभागाने सांगितलं आहे. ल्फिस्टन पूल परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. पऱळ येथून सिद्धिविनायक मंदिर, दादर, लोअर परळ, वरळीला जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो. तसंच प्रभादेवी येथून दादर पूर्व, लालबाग, शिवडी, परळ व्हिलेज येथे जाण्यासाठी हा पूल वापरला जातो. त्यामुळेच जर हा पूल बंद केला तर करी रोड आणि दादरमधील पुलांवर अतिरिक्त भार पडणार आहे. त्याचं नियोजन करणं वाहतूक विभागासाठी मोठी कसरत असणार आहे, कारण येथून रोज हजारोंच्या संख्येने वाहनं जातात. दरम्यान वाहतूक विभागाने याची तयारी केल्याची माहिती आहे.

परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पुल हा कायमच रहदारीचा मार्ग ठरला आहे. एल्फिस्टन पूलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पुल पूर्णत: बंद करा अशी स्थानिकांची मागणी आहे. स्थानिकांनी जोरदार निदर्शने करत काम बंद पाडलं होतं. वाहतूक विभागाने आता नवी तारीख जाहीर केल्यानंतर स्थानिक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

नगररचना विभागाने 2025-26 आर्थिक वर्षात जमा केला 541.84 कोटी रक्कमेचा विक्रमी महसूल…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’च्या संशोधकाचा‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

महाराष्ट्रातील बेटांवर ध्वजारोहणाचा ऐतिहासिक उपक्रमजिल्ह्यात घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta