vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

         सांगली प्रतिनिधी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.शक्यतो तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करण्यात येऊ नये. वीज संच मांडणीस कमीत कमी जोड असावेत. वीज संच मांडणीची उभारणी अधिकृत विद्युत ठेकेदार यांच्याकडूनच करण्यात यावी. लोखंडी साहित्य वापरुन स्टेज उभारणी केल्यास धातूच्या भागास सक्षम भुसंबंधन / अर्थिंगशी जोडण्यात यावे. वीज संच मांडणीस अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अथवा तत्सम उपकरणाची (स्वीचगिअर) ची जोडणी करण्यात यावी. गणपती विसर्जन मिरवणुकमध्ये / शोभा यात्रा गाड्यांची उंची नियमानुसार राखावी जेणेकरुन उघड्या वीज वाहिनीच्या संपर्कात येणार नाही. वीज संच मांडणीवर क्षमतेपेक्षा जास्त भार (लोड) जोडण्यात येऊ नये. संच मांडणी सहजासहजी लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

यळकोट यळकोट जय मल्‍हार…..!देवस्‍वारी, खंडोबाच्‍या पालखी पूजनाने #माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

देशभरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta