vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशभरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा

 देशभरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा

राज्य प्रतिनिधी-देशभरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत प्रचंड पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, नद्यांना पूर येणे, रस्ते वाहतूक ठप्प होणे आणि दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नद्यांच्या आणि ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनानेही मदत–साहाय्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे

मुसळधार पावसाचा शेतीवर आणखी परिणाम होऊ शकतो. आधीच उभ्या पिकांवर पावसामुळे पाणी साचल्याने हानी झाली असून येत्या दिवसांत शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढण्याची शक्यता आहे.सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हवामान खात्याने दिलेला हा इशारा गांभीर्याने घ्यावा आणि नागरिकांनी अनावश्यक धोकादायक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पाऊस होऊ शकतो तर 11 ते 12 सप्टेंबरला ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस होईल. दरम्यान इतक्या मोठ्या पूरानंतरही पंजाबमध्ये पावसाचा धोका हा कायम आहे. सुमारे 4 लाख लोक पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. या पावसामुळे अनेक हेक्टर पिकांचे नुकसान देखील झाले. उत्तराखंडमध्ये आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. डेहराडून, हरिद्वार, जोशीमठ, लॅन्सडाउन, मसूरी शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेच नाही तर लोकानी नद्यांपासून दूर राहण्याचे आदेशही प्रशासनाने दिली आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे१,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे अधिक गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• *रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती *मुंबई ३.० साठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा एकात्मिक मास्टर प्लॅन……

vishwatmaklokswamivarta

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन· राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरआणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन