vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

रायगड, प्रतिनिधी– हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

राज्यात क्रीडा व खेळांचा प्रसार व्हावा, युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्मिती व्हावी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविला जाणार आहे.२९ ऑगस्ट, सकाळी १० वाजता जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्कारार्थी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा भव्य सत्कार.३० ऑगस्ट – विविध शाळांमधून क्रीडा स्पर्धांचे आयोजन. तसेच संघटनांच्या माध्यमातून चर्चासत्र व परिसंवाद.३१ ऑगस्ट, अलिबाग येथे – भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित. यामध्ये १५ वर्षाखालील मुले-मुली, १८ वर्षाखालील मुले-मुली, खुला गट (पुरुष व महिला) तसेच वरीष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश असेल.स्पर्धकांना प्रमाणपत्रे तर विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीज देण्यात येणार आहेत.

 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात राज्यस्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न 🌟

vishwatmaklokswamivarta

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta

बाल मित्र कॅरम क्लबच्यावतीने भायखळा – माझगांव लव्हलेन येथे भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta