vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

जालना प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी शासनाच्या विविध पुरस्कारासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना यांच्याकडे दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देवून गौरविण्यात येत असते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी !

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा

vishwatmaklokswamivarta

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन,बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta