vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती,कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार..

मुंबई, प्रतिनिधी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम, १९४८ मधील काही तरतुदींमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

या दुरुस्ती अंतर्गत कलम ५४ मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कलम ५५ मध्ये विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे. यातील कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच कलम ६५ मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. त्याचबरोबर, आठवड्यात ४८ तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले आहे.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले की, कामगारांकडून जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्यासबंधीचे बदल यात सुचविण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ease of doing business च्या धोरणा अंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्वाचे आहेत. या बदलांमुळे उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता मिळेल तर कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजाचे वातावरण उपलब्ध होणार आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग…

vishwatmaklokswamivarta

प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपूयात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नागपूर येथील विविध तमिळ संस्थांच्यावतीने राज्यपालांचा सन्मान

जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या पूर्ण करा- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना विभागाचा घेतला आढावा…

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार– अभिनेते अमीर खान

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta