vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

दत्त माहात्म्य

         –  दत्त माहात्म्य –

 

अध्यात्मिक वार्ता-

गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत , त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही. कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत. अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहेमी येते . सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात. का असं सांगितलं असेल ? कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते ?? कैक उदाहरणे यादाखल देता येतील. नकारात्मक आणि सकारात्मक देखील.

थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे . ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हगवण सुरु होऊन तो फार अशक्त झाला. त्या वेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला कि तुम्ही पंचपक्वांन्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल. हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेऊ घातले. याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते ,त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी हि अवस्था झाली आहे . तू यातून बरा होशील असे दिसत नाही . यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य . शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहावसान झाले .हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम.

दत्त माहात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूढ असा पुत्र जेवला तेव्हा ,सतीचे हाताने मिळता अन्न l तयाचा भ्रम गेला निघोन ll असे म्हटले आहे . हा अन्नाचा सकारात्मक परिणाम.

प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरीत आले होते ,दत्त महाराजांना आग्रहाने जेऊ वाढल्याचे फळ हे मोक्षस्वरूप होते ,यापेक्षा अधिक कोणते फळ असेल ??? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतिकरिता उपयुक्त ठरते . श्री गुरुदेव दत्त !!! –
अभय आचार्य

संबंधित पोस्ट

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

*नागा साधूंचे रहस्य**अद्भूत दुनिया काहीही न मागणारे साधू… 40% गायब होतात कुंभात!*

vishwatmaklokswamivarta

26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा

भारतातील सर्वात मोठ्या कला आणि संस्कृती शिखर परिषदेचा  समारोप*

vishwatmaklokswamivarta

नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?  व्रताचे नियम

vishwatmaklokswamivarta

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘मुरलीचे सूर’ कार्यक्रमातून कृष्णगीतांची सुरेल मैफल· ४ सप्टेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta