vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास…

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास…

   मुंबई प्रतिनिधी- केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटी स्लॅब १२ टक्के आणि २८ टक्के रद्द करून केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. नवरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. त्यामुळे सणासुदीच्या काळात जनतेला दिलासा मिळेल. सामान्य नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लघु, मध्यम उद्योजकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. या सुधारणांमुळे व्यापार सुलभ होईल, बाजारपेठेतील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

0000

 

देवेंद्र पाटील/ज.सं.अ./

संबंधित पोस्ट

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार; समिती काढणार वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा…

vishwatmaklokswamivarta

राजस्थानमध्ये जोधपूर इथं झालेल्या रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू तर तेलंगणमध्ये रंगारेड्डी इथल्या अपघातात १७ जण मृत्यूमुखी, पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख.

vishwatmaklokswamivarta

ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta