vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय जनता पार्टीच्या २१ शाखांचे एकाच दिवशी भव्य उदघाटन

भारतीय जनता पार्टीच्या २१ शाखांचे एकाच दिवशी भव्य उदघाटन

जालना, (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी, जालना महानगर जिल्ह्यातील संघटनात्मक कार्यात मोठा टप्पा गाठत, आज (दि.०५) “सेवा पंधरवाडा” अंतर्गत जालना शहरातील रामनगर, भिमनगर, गांधी नगर, आरेफ कॉलनी, सुवर्णकार नगर तसेच इतर महत्त्वाच्या परिसरांमध्ये २१ नवीन शाखांचे उदघाटन यशस्वीरीत्या संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे आणि मा.आ. कैलासजी गोरंट्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे होते. यावेळी मा. नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल आणि भाजपा युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल यांची विशेष उपस्थिती होती.

उदघाटनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते घनतृप्त हनुमान मंदिरपर्यंत भव्य मोटारसायकल रैली काढण्यात आली, ज्यात शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, राजेशजी राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, ममता कोंड्याल, वर्षाताई ठाकूर, धनराज काबलिये, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष महेश निकम, ग्रामीण मंडळ तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, बाबुराव पवार, अशोक पवार, जीवन सले, शिवादादा शेजूळ, संजय भगत, कपिल भुरेवाल, विजय पवार, माजी नगरसेवक गणेश जल्लेवार, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, विनाताई सामलेटी, संजयजी भगत, राजना येनगुपटला, सखुबाई पणबिसरे, देविदास जाधव, बालाजी रोडे, संजयजी पाखरे, सोनू सामलेटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने शहरातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजी-माजी नगरसेवक, जि.प.प.स. सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी बनवला.बाबासाहेब पाटील कोलतेप्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

vishwatmaklokswamivarta

बाबूरावजींनी अनेकांना प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

vishwatmaklokswamivarta

पानेवाडीत रंगला कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांना घाटगे पाटलांच्या मानाची बक्षिसे -पानेवाडीत कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांचा सत्कार!

ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन