vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

      अमरावती, प्रतिनिधी: शांघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील युवकांना मिळणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.   जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा होणार आहे. यात जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य सादर करण्याची स्पर्धा होणार आहे.  जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने स्किल कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.

   जागतिक कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सदर स्पर्धेमध्ये 50 क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मॅकेट्रॉनिक्स, ऑप्‍टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्टेथिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

   शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेत सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. वर्ष 2026 मधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in यावर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

क्रीडा प्रशिक्षण शिबीर १२ मे पासून

कबड्डी असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी स्पर्धा…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ नामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना उत्तम संधी …

व्यायामशाळा बांधकामाच्या अनुदान रकमेत वाढ पात्र संस्थांनी लाभ घ्यावा