vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ नामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना उत्तम संधी …

नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ नामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना उत्तम संधी …

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -आपले खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत ही आपली इच्छा असते, मात्र त्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्याची अतिशय गरज असून नवी मुंबई महानगरपालिका त्यादृष्टीने अत्यंत नियोजनबध्द कार्यवाही करीत असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी क्रीडांगणे व क्रीडा सुविधांच्या विकासासाठी महानगरपालिकेने विविध खेळांतील तज्ज्ञांची समिती गठीत केली असून त्या माध्यमातून विविध देशी आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने नामांकित व्हॉलीबॉलपटूंचा कौशल्यपूर्ण खेळ बघण्याची संधी नवी मुंबईतील खेळाडूंना व क्रीडाप्रेमींना उपलब्ध होणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सेक्टर 16, वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (मॉडर्न) महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 – 25’ उद्घाटन प्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे आपले मनोगत व्यक्त करीत होते.

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी यांच्या सहयोगाने संपन्न होणा-या नवी मुंबई महानगरपालिका आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे समवेत सह पोलीस आयुक्त श्री.संजय येनपुरे, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू श्री.शुभम वनमाळी, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री.विजयभाऊ डांगरे, उपाध्यक्ष श्री.धनंजय वनमाळी, सचिव श्री.संजय नाईक, सहसचिव श्री.निलेश जगताप, कोषाध्यक्ष श्री.अरविंद गवई, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शुभदा नाईक, इंटरनॅशनल बास्केटबॉलपटू श्री. स्वामीनाथन तसेच सर्व विभागांच्या असोसिएशनचे सचिव, पदाधिकारी आणि स्पर्धा संयोजन सचिव श्री.किरण स्टेनली व ठाणे जिल्हा सचिव श्री.किरण बावस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

   याप्रसंगी बोलताना नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त श्री.संजय येनपुरे यांनी नवी मुंबई शहर आता अधिक प्रगल्भ होत असल्याचे सांगत येथील नागरिक उत्तम गोष्टींना प्रोत्साहन देणारे आहेत, त्यामुळे राज्यभरातून आलेल्या व्हॉलीबॉलपटूंचे शहरात उत्साही स्वागत करीत असल्याचे ते म्हणाले. स्वत: राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल खेळाडू असल्याने मैदानी खेळाचे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी असलेले महत्व विशद करीत त्यांनी सोशल मिडियाचा प्रचंड प्रभाव असलेल्या आजच्या युगात मैदानी खेळांची आवड जोपासणा-या खेळाडू युवक-युवतींचे मुक्तकंठाने कौतुक केले.

क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांच्या वतीने राज्यभरातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत केले. या स्पर्धेतील खेळ बघून राज्याचा संघ निवडला जाणार असल्याने या स्पर्धेचे खेळाडूंच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखीत करीत त्यांनी शुभेच्छा दिल्या

 महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने बोलताना उपाध्यक्ष श्री.धनंजय वनमाळी यांनी नवी मुंबई स्वच्छतेसह प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असते असे सांगत या स्पर्धेच्या आयोजनासाठी आयुक्तांनी दिलेल्या मान्यतेबद्दल आभार व्यक्त केले,

21 ते 23 मार्च 2025 या 3 दिवसांच्या कालावधीत आयोजित ‘नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 – 25’ यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, धुळे, वर्धा, पुणे, अहिल्यानगर, धाराशीव, लातूर, सातारा, सांगली, संभाजीनगर, हिंगोली हे सोळा पुरूष संघ तसेच मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे, जालना, अमरावती, नाशिक, संभाजीनगर हे आठ महिलांचे संघ सहभागी झाले असून रविवार, दि. 23 मार्च 2025 रोजी सायं. 6 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

 या माध्यमातून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असणा-या नामांकित खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी नवी मुंबईकरांना प्राप्त होणार असून नवी मुंबईमधील तमाम क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धांच्या निमित्ताने नवी मुंबईत येणा-या नामवंत व्हॉलिबॉलपटूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

0000000

 

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात राज्यस्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न 🌟

vishwatmaklokswamivarta

रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव-2023 चा तिसरा दिवस उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पुरुष गटात लातूर व महिला गटात पुणे विभागांचे संघ,नमुंमपा चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपदाचे मानकरी..

vishwatmaklokswamivarta

खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे ‘खो-खो’ ला पाठबळ

vishwatmaklokswamivarta

हाँगकाँगविरुद्ध आशिया चषक 2022, जगातील पहिला फलंदाज रोहित शर्माने, इतिहास रचला…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार