vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

       अमरावती, प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे गुरूवार, दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जगदंब महाविद्यालय, अचलपूर येथे हा मेळावा होणार आहे.

   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात कोलब्रो गृप प्रा. लि., भारत फायनान्स प्रा.लि., स्विगी, जिनस पावर, क्वेज कॉर्पोरेशन प्रा. लि. पुणे, दामोधर इंडस्ट्रीज प्रा. लि., टाटा मोटर्स, पुणे, ग्रिनफॅब सोलर खादी, कोअर प्रोजेक्ट, धूत ट्रान्समिशन संभाजीनगर, जाधव गियर्स, स्पंदन मायक्रो फायनान्स ली., मेस्कोर प्रेसीजन प्रा. लि., क्रेडीट ॲक्सीस ग्रा. लि., ब्लिंकीट प्रा. लि., तसेच विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

 मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

डॉ.आंबेडकर सभागृहात आज (दि.८)पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 21 ऑगस्ट रोजी अमरावती येथे‘विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन

जालना येथे अनिवासी उद्योजकता- विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta