vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी गौणखनिज व रेती माफियांकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याची खात्री करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांकडून हा प्रकार होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी पालकमंत्री ना. पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत त्यांनी जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला दिले.

पालकमंत्री ना. पाटील यांनी स्पष्ट केले की, महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर हा प्रशासनाच्या कामकाजात अडथळा आणणारा आणि कायद्याला थेट आव्हान देणारा प्रकार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

*****

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत-माजी मंत्री नेते छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; ईडीची याचिका फेटाळली..

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन;• पुनर्वसनाला प्राधान्य देत २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; मुंबईकरांचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद : मंत्री मंगलप्रभात लोढा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा रोजगार देणारे व्हा-कुलगुरु डॉ.फुलारी कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे