vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात या मागणीसाठी….

मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात या मागणीसाठी….

*गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट*

मुंबई प्रतिनिधी  – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या 13 टक्के आणि अनुसूचित जमातीच्या 7 टक्के जागा आरक्षित करून लोकप्रतिनिधीत्व संविधानिक तरतुदीनुसार देण्यात येत आहे. त्या प्रमाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 13 टक्के आणि अनुसूचित जमाती साठी 7 टक्के जागा आरक्षित केल्या पाहिजेत या मागणीसाठी आज केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव सुमित वजाळे; प्रविण मोरे उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या 228 जागांपैकी केवळ 11 जागा या अनुसुचित जाती साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई मनपा मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टी च्या जागा आरक्षित करण्यात आल्या पाहिजेत.मात्र अद्याप लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीला न्याय्य वाटा मिळालेला नाही याबाबत गौतम सोनवणे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांचे लक्ष वेधले. लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबई मनपा मध्ये एस सी एस टी च्या जागा आरक्षित कराव्यात अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे. मुंबई मनपाच्या सन 1818 सालच्या कायद्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात मनपा च्या प्रभागांची संख्या निर्धारित करण्याचे नमूद आहे. याबाबत कायद्यानुसार योग्य तो विचार करण्यात येईल असे आश्वासन राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी गौतम सोनवणे यांना आश्वासन  दिले

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू..

vishwatmaklokswamivarta

मला माझ्या प्रेक्षकांना—आणि स्वतःलाही आश्चर्यचकित करायला आवडते”: आमीर खान उपस्थितीत गाजली 56 व्या इफ्फीची शेवटची ‘फायरसाईड चॅट’

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीअपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामपंचायत निवडणूकः कामगारांना मतदानासाठी तीन तासांची सवलत

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील शहर मजार-ए-शरीफजवळ बसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta