vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

राज्य प्रतिनिधी-ठाणे,द:- ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे.

या स्पर्धेमध्ये 1) ‘वन्यजीव’, 2) ‘निसर्ग’, 3) ‘संस्कृती आणि परंपरा’ तसेच 4) ‘बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प’ या चार विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारली जातील. प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 4 छायाचित्रे पाठवता येतील. एकाच विषयाचे चार फोटो असल्यास Category_Name_mobile number_1; Category_Name_mobile number_2 ; Category_Name_mobile number_3 ; Category_Name_mobile number_4 अशी नावे देवून पाठवावीत. ही छायाचित्रे उच्च दर्जाची (High-Resolution HD 10MB) असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे thanedio2025@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत. छायाचित्रे सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2025, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम 100 छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आहे.

ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे

00000

 

संबंधित पोस्ट

महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला; ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली ग्वाही- एनएबीएल टेस्टिंग लॅब प्रकल्पात अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन- उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात करण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; धोतर्डी येथे समाधान शिबिराला मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते विविध दाखले व लाभ वितरण

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक