vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

 नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

जालना, (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईविषयी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेला व्हिडीओ द्वारे अपमानास्पद अशोभनीय चित्रण तयार करून नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा जालना याचा जाहीर निषेध करतो व भविष्यात मातृशक्ती विषयी प्रसार माध्यमांसमोर अपमानास्पद वक्तव्य न थांबवल्यास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा याचे चोख प्रतिउत्तर देतील असे आज दि.१३ संप्टेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयासमोर झालेल्या निषेध आंदोलनाच्या वेळी बोलताना संगीताताई गोरंटयाल यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे यांनी बोलतांना सांगितले की, कॉंग्रेस ची संस्कृती हि नारी शक्तीचा अपमान करणारी असून त्यांच्या या कृत्यामुळे त्यांची हि विकृती दिसून आलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे मातृशक्ती, नारीशक्तीचा कायमच सन्मान करत आलेले आहे. त्यांच्या आई चा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, त्यांनी धुणीभांडी करून आपल्या मुलाला सुसंकृत बनविले त्यांला राष्ट्रभक्ती चे धडे दिले व नरेंद्रभाई सारखे राष्ट्रभक्त कणखर पंतप्रधान या देशाला दिले अशा नेत्याच्या आई विषयी अपमानास्पद वक्तव्य करून कॉंग्रेसने आपली मातृशक्ती व नारी शक्ती विषयी असलेली आत्मीयता आपल्या या वक्तव्यातून या देशातील नारी शक्तीला दाखवून दिली आहे. देशातील नारी शक्ती त्यांच्या असल्या विकृत कृतीचा जाहीर निषेध करून आगामी काळात याचे प्रतिउत्तर देतील व कॉंग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जालना ग्रामीण जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, जालना महानगर जिल्ह्यातील ग्रामीण मंडळ अध्यक्षा सुषमा खरात, सखुबाई पनबीसरे, दिपाली बीनीवाले, नीलावती धावणे, विशाखा नाईक, सुरेखा बोटुळे, वैशाली बनसोडे, वंदना ढगे, ममता कोंड्याल, वर्षा ठाकूर, स्नेहा जोशी, विद्याताई कुलकर्णी, सुनंदा बदनापूरकर, शितल तनपुरे, पुष्पा मेहेत्रे, अरुणा फुलमाम्बडीकर, मंदा पवार आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी युवा नेते अक्षय भैया गोरंटयाल, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, महेश निकम, संजय डोंगरे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, वसंत शिंदे, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, सिद्धिविनायक मुळे, अॅड. अर्जुन राऊत, गजानन खरात, गणेश वाघमारे, गौरव गोधेकर, रोहित नलावडे, गुलाब पणबिसरे आदींसह उपस्थिती होती.

000000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta