vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड 

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड

कोल्हापूर, प्रतिनिधी: जिल्ह्यात पडणाऱ्या पर्जन्यमानामुळे पुरस्थिती निर्माण होते .या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड यांनी दिली . राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकाची आज पाहणी केली.

           जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल,दुरुस्ती,प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

         प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रेस्क्यू बोट,लाइफ जॅकेट,लाइफ रिंग,सॉकर कटर,हायड्रोलिक कटर,रेस्क्यू रोप,इमर्जन्सी फ्लोटींग लाईट्स आदींची प्रत्यक्ष पाहणी श्री राठोड यांनी यावेळी केली.

          याप्रसंगी करवीर तहसीलदार स्वप्निल पवार अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते .00

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत नोंदणी करणेकरिता आवाहन*

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ..

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदनमहानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचा-यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान