vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अभ्यासिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अभ्यासिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

  सांगली, प्रतिनिधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास या योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयामध्ये ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका सुरु आहे. या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच, करिअरविषयक मार्गदर्शन करण्याबाबतची पुस्तके, मासिके व वर्तमान पत्रे उपलब्ध करुन देण्यात येतात. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती इनुजा शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

  अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ०२३३ २९९०३८३

00000

संबंधित पोस्ट

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)*मंत्रिमंडळ निर्णय …

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

नवजात शिशू गहाळ प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल, चौकशी समिती स्थापन…

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 58 उमेदवारांची निवड

vishwatmaklokswamivarta